Posts

दगडी कोळसा आणि पेट्रोलियम

Image
दगडी कोळसा आणि पेट्रोलियम   1. CNG आणि LPG इंधन म्हणून उपयोग करण्याचे फायदे कोणते ? उत्तर:- CNG आणि LPG इंधनाचे फायदे खालील प्रमाणे आहेत. 1.     CNG आणि LPG इंधनाचे जेंव्हा ज्वलन होते , तेंव्हा जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 2.      CNG आणि LPG इंधनाचे ज्वलन सहजरित्या होत. 3.     CNG आणि LPG इंधनाचे वहन पाईपव्दारे सहजरित्या करता येते. 4.     ही इंधने स्वच्छ आहेत. 5.     CNG आणि LPG इंधन जळत असताना धूर निर्माण होत नाही.   2. रस्ते बनवतानां पेट्रोलियमच्या कोणत्या उत्पादिताचा उपयोग केला जातो त्यांची नावे सांगा. उत्तर:- रस्ते बनवतानां पेट्रोलियमच्या बिटुमेन या उत्पादिताचा उपयोग केला जातो.   3. मृत वनस्पतीपासून कोळशाची कशी निर्मिती होते त्याचे वर्णन करा. त्या प्रक्रियेला काय म्हणतात ? उत्तर:- 1.     मिलियन वर्षापुर्वी घनदाट अरण्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीखाली गाडली गेली. 2.     त्याच्यावरती मातीचे थर वाढत गेले , ज्यामुळे झाडांचे अवशेष दबले गेले. 3.     यामुळे उच्च दाब आणि उच्च तापमान निर्माण झाले. 4.     अशा परिस्थितीत त्यांचे मंद गतीने ज्वलन होत गेले आणि त्यांचे र

द्रव्य : धातू आणि अधातू

Image
                       द्रव्य : धातू आणि अधातू                               स्वाध्याय   प्र. 1. खालीलपैकी कोणत्या पदार्थावर प्रहार करून पातळ पत्रा बनतो ? a. जस्त            b. फॉस्फरस c. सल्फर          d. ऑक्सिजन प्र. 2. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? a. सर्व धातू तंतूभवनशील आहेत. b. सर्व अधातू तंतूभवनशील आहेत. c. सामान्यपणे धातू तंतूभवनशील आहेत. d. काही अधातू तंतूभवनशील आहेत. प्र. 3. रिकाम्या जागा भरा. a. फॉस्फरस हा अत्यंत क्रियाशील अधातू आहे. b. उष्णता आणि विद्युतधारेचे धातू उत्तम वाहक आहेत. c. तांब्यापेक्षा लोखंड जास्त क्रियाशील आहे. d. धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होवून हायड्रोजन वायूची निर्मिती होते. प्र. 4. जर विधान खरे असेल तर 'T' खूण करा आणि चूक असेल तर 'F' खूण करा. a. सामान्यपणे अधातू आम्लांशी अभिक्रिया करतात .               ( F ) b. सोडियम हा अतिक्रियाशील धातू आहे .                              ( T ) c. तांबे झिंकला झिंकसल्फेट द्राावणामधून वि स्था पीत करते . ( F ) d. कोळशाला खेचून तार बनवू शकतो .