Posts

Showing posts from October, 2020

द्रव्य : धातू आणि अधातू

Image
                       द्रव्य : धातू आणि अधातू                               स्वाध्याय   प्र. 1. खालीलपैकी कोणत्या पदार्थावर प्रहार करून पातळ पत्रा बनतो ? a. जस्त            b. फॉस्फरस c. सल्फर          d. ऑक्सिजन प्र. 2. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? a. सर्व धातू तंतूभवनशील आहेत. b. सर्व अधातू तंतूभवनशील आहेत. c. सामान्यपणे धातू तंतूभवनशील आहेत. d. काही अधातू तंतूभवनशील आहेत. प्र. 3. रिकाम्या जागा भरा. a. फॉस्फरस हा अत्यंत क्रियाशील अधातू आहे. b. उष्णता आणि विद्युतधारेचे धातू उत्तम वाहक आहेत. c. तांब्यापेक्षा लोखंड जास्त क्रियाशील आहे. d. धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होवून हायड्रोजन वायूची निर्मिती होते. प्र. 4. जर विधान खरे असेल तर 'T' खूण करा आणि चूक असेल तर 'F' खूण करा. a. सामान्यपणे अधातू आम्लांशी अभिक्रिया करतात .               ( F ) b. सोडियम हा अतिक्रियाशील धातू आहे .                              ( T ) c. तांबे झिंकला झिंकसल्फेट द्राावणामधून वि स्था पीत करते . ( F ) d. कोळशाला खेचून तार बनवू शकतो .              

प्रकरण 2. आम्ल, अल्कली आणि क्षार

Image
प्रकरण 2. आम्ल, अल्कली आणि क्षार  प्रश्न:- पान नंबर - 22  1 .  तुम्हाला तीन परिक्षानळ्या पुरविलेल्या आहेत. त्यापैकी एका परिक्षानळीमध्ये   उर्ध्वपातीत पाणी आहे आणखी दोन परिक्षानळीमध्ये अनुक्रमे आम्लीय द्रावण आणि   अल्कलीय द्रावण  आहे. जर तुम्हाला फक्त लाल लिटमस पेपर पुरविला आहे ,  प्रत्येक   परिक्षानळीमधील पदार्थांची ओळख कशी कराल ?        उत्तर:- फक्त लाल लिटमस पेपरचा उपयोग करून दिलेल्या परीक्षानळीतील पदार्थांची ओळख   करता येते. या लिटमस पेपरच्या लाल रंगामध्ये झालेल्या बदलाच्या आधारे परिक्षण करता येते. 1.     ज्या द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर बुडवला असता त्याच्या रंगामध्ये जर बदल झाला नाही. तर याचा अर्थ दिलेले द्रावण हे उदासीन आहे. [उर्ध्वपातीत पाणी] 2.     ज्या द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर निळा होईल , तर दिलेले द्रावण हे अल्कली असेल. [अल्कली द्रावण] नंतर याच निळ्या लिटमस पेपरचा उपयोग पुढील परिक्षणासाठी करता येतो. 3.     वरील पध्दतीने प्राप्त झालेला निळा लिटमस पेपर जर राहिलेल्या द्रावाणामध्ये बुडविला आणि त्याचा रंग जर तांबडा झाला तर दिलेले   द्रावण आम्लीय आहे असे आपण म्हणू शकतो.