द्रव्य : धातू आणि अधातू

 

                    द्रव्य : धातू आणि अधातू

                              स्वाध्याय

 

प्र.1. खालीलपैकी कोणत्या पदार्थावर प्रहार करून पातळ पत्रा बनतो?

a. जस्त          b. फॉस्फरस

c. सल्फर         d. ऑक्सिजन


प्र.2. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

a. सर्व धातू तंतूभवनशील आहेत.

b. सर्व अधातू तंतूभवनशील आहेत.

c. सामान्यपणे धातू तंतूभवनशील आहेत.

d. काही अधातू तंतूभवनशील आहेत.


प्र. 3. रिकाम्या जागा भरा.

a. फॉस्फरस हा अत्यंत क्रियाशील अधातू आहे.

b. उष्णता आणि विद्युतधारेचे धातू उत्तम वाहक आहेत.

c. तांब्यापेक्षा लोखंड जास्त क्रियाशील आहे.

d. धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होवून हायड्रोजन वायूची निर्मिती होते.


प्र.4. जर विधान खरे असेल तर 'T' खूण करा आणि चूक असेल तर 'F' खूण करा.

a. सामान्यपणे अधातू आम्लांशी अभिक्रिया करतात.              (F)

b. सोडियम हा अतिक्रियाशील धातू आहे.                             (T)

c. तांबे झिंकला झिंकसल्फेट द्राावणामधून विस्थापीत करते. (F)

d. कोळशाला खेचून तार बनवू शकतो.                                (F)


प्र.5. खालील तक्त्यामध्ये काही गुणधर्मांची यादी दिलेली आहे. या गुणधर्मांच्या आधारे धातू आणि अधातू यांची तुलना करा.

गुणधर्म

धातू

अधातू


1. दृष्यीय स्वरुप

(appearance)

 

2. काठीण्याता / कठोर

 

   

3. प्रसरणशीलता

 

 

4. तंतूभवनशीलता

 

 

5. उष्णतेचे वहन

 


6. विद्युतप्रवाहाचे वहन


चकाकी असते.

 

 

धातू कठीण असतात.

 

 

पातळ पत्रा बनविता येतो

 

 

तार काढता येते.

 

 

उष्णतेचे उत्तम वाहक असतात.

 

विद्युत धारेचे उत्तम वाहक असतात.


निष्प्रभ असतात.[चकाकी नसते]

 

 

अधातू ठिसूळ असतात.

 

 

पातळ पत्रा बनविता येत नाही.

 

 

अधातूंची तार काढता येत नाही

 

 

उष्णतेचे दुर्वाहक असतात .

 

 

 अधातू विद्युत धारेचे दुर्वाहक असतात.

 

 प्र.6. खालील प्रश्नांची कारणे द्या.

     a.    ॲल्युमिनीयम पातळ पत्र्याचा (Foil) उपयोग खाद्य पदार्थांना लपेटण्यासाठी केला                 जातो.

          उत्तर : - ॲल्युमिनीयम पातळ पत्र्याचा (Foil) उपयोग खाद्य पदार्थांना लपेटण्यासाठी                         केला जातो कारण : ‌-

      1.अ‍ॅल्युमिनियम हा धातू प्रसरणशील असल्यामुळे त्याचा पातळ पत्रा बनविता येतो.

 2.खाद्य पदार्थांबरोबर क्रिया करत नाही.


b.    द्रवरुप पदार्थांना उष्णता देण्यासाठी निमज्जन कांड्या (द्रवात बुडवून ठेवण्याच्या कांड्या) धातूयुक्त पदार्थापासून निर्मित होतात.

     उत्तर : - द्रवरुप पदार्थांना उष्णता देण्यासाठी निमज्जन कांड्या (द्रवात बुडवून ठेवण्याच्या             कांड्या) धातूयुक्त पदार्थापासून निर्मित होतात. कारण धातू हे उष्णतेचे आणि विद्युत धारेचे           उत्तम वाहक असतात.

 

    c. कॉपर झिंकला त्याच्या क्षारयुक्त द्रावणातून विस्थापित करू शकत नाही.

    उत्तर : - कॉपर झिंकला त्याच्या क्षारयुक्त द्रावणातून विस्थापित करू शकत नाही.कारण कॉपर       हे  झिंकपेक्षा कमी क्रियाशील असते.

 

   d. सोडियम आणि पोटॅशियम केरोसीनमध्ये साठवितात.

   उत्तर : - सोडियम आणि पोटॅशियम केरोसीनमध्ये [रॉकेल] साठवितात.कारण सोडियम आणि       पोटॅशियम हे धातू जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे ते हवेबरोबर आणि पाण्याबरोबर पटकन       क्रिया करतात. पण केरोसिनबरोबर ते क्रिया करत नाहीत.


प्र.7. तुम्ही लिंबूचे लोणचे ॲल्युमिनीयमच्या भांड्यामध्ये साठवून ठेवू शकाल? स्पष्टीकरण द्या.

उत्तर : नाही, आम्ही लिंबूचे लोणचे ॲल्युमिनीयमच्या भांड्यामध्ये साठवून ठेवू शकत नाही. कारण अ‍ॅल्युमिनियम हा धातू आहे आणि लिंबूचे लोणचे हे अ‍ॅसिड आहे. जेंव्हा धातू अ‍ॅसिडच्या संपर्कात येतात. तेंव्हा त्यांची रासायनिक क्रिया घडते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो व त्यातील पदार्थ हे बाधित/विषारी बनतात. जे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक बनतात.


प्र.8. स्तंभ A मध्ये काही पदार्थ दिलेले आहेत त्यांची स्तंभ B मध्ये दिलेल्या त्यांच्या उपयोगांशी जुळवणी करा.

A

B

1. सोने

2. आयर्न (लोह)

3. ॲल्युमिनीयम

4. कार्बन

5. कॉपर (तांबे)

6. मर्क्युरी (पारा)

a. तापमापी

b. विद्युत तार

c. खाद्यपदार्थ लपेटण्यासाठी

d. दागीने

e. मशीन

f. इंधन

 

उत्तर:

   

A

B

1. सोने

2. आयर्न (लोह)

3. ॲल्युमिनीयम

4. कार्बन

5. कॉपर (तांबे)

6. मर्क्युरी (पारा)

d] दागिने

e] मशीन

c] खाद्यपदार्थ लपेटण्यासाठी

f] इंधन

b] विद्युत तार

a] तापमापी

  

 प्र. 9. काय होईल जेव्हा -

a. सौम्य सल्फुरिक आम्ल कॉपर प्लेटवर टाकले जाते.

संबंधित रासायनिक अभिक्रियांचे शब्द समिकरण लिहा.

 

उत्तर : - जेंव्हा सौम्य सल्फुरिक आम्ल कॉपर प्लेटवर टाकले जाते.तेंव्हा कॉपरची सौम्य सल्फ्युरिक आम्लाबरोबर क्रिया करते, यावेळी  कॉपर सल्फ़ेट तयार होते आणि हायड्रोजन वायू तयार होतो.


सल्फ्युरिक आम्ल + कॉपर    कॉपर सल्फेट + हायड्रोजन

          H2SO4         +  Cu                CuSO4    +       H2

 

b. लोखंडी खिळे कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवले जातात.

संबंधित रासायनिक अभिक्रियांचे शब्द समिकरण लिहा.

उत्तर :‌ - जेंव्हा लोखंडी खिळे कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवले जातात.तेंव्हा विस्थापन अभिक्रिया घडते व लोखंड तांब्याला विस्थापित करते. फेरस सल्फेट आणि  कॉपर तयार होते.

आयर्न + कॉपर सल्फेट      फेरस सल्फेट + कॉपर  

   Fe   +   CuSO4                FeSO4    Cu


प्र.10. सलोनीने जळणाऱ्या लाकडी कोळशाचा तुकडा घेतला आणि त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या वायूला एका परिक्षा नळीमध्ये जमा करा.

a. ती वायूचे स्वरुप कसे शोधून काढील?

उत्तर : -

1.  कोळशाचा तुकडा जाळला असता त्यातून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो आणि असा वायू जेंव्हा चुन्याच्या निवळीतून जायला दिला असता ती दुधी बनते.

2. निळा आणि तांबडा लिटमस पेपरचा पण वापर करून वायूचे परीक्षण करता येते. या वायूच्या द्रावणात निळा लिटमस तांबडा होतो.म्हणून हे आम्लीय आहे.


b. या प्रक्रियेमध्ये घडणाऱ्या सर्व अभिक्रिया शब्द समिकरणाच्या स्वरूपात लिहा.


उत्तर : -           कार्बन    +       ऑक्सीजन    कार्बन डायऑक्साइड

 कार्बन डायऑक्साइड + चुन्याची निवळीचुन्याची निवळी दूधी बनते

 

 प्र.11. एके दिवशी रीटा आपल्या आईबरोबर दागदागीन्यांच्या दुकानात गेली. तिच्या आईने सोनाराला पॉलीश करण्याच्या हेतूने सोन्याचे जुने दागीने दिले. पुढील दिवशी जेव्हा त्यांनी दागीने परत आणले तेव्हा त्यांना दागीन्यांच्या वजनामध्ये थोडीशी घट आढळली. तुम्ही वजनातील घटीचे कारण सांगू शकाल?

उत्तर : - कारण दागिने पॉलिश करण्यासाठी आम्लीय द्रावणाचा उपयोग केला जातो. आम्लाबरोबर सोन्याची रासायनिक अभिक्रिया घडते आणि दागिण्यातील काही सोन्याचे ऑक्साइड मध्ये रुपांतर होते.म्हणून पॉलिश केल्यानंतर दागिन्यांच्या  वजनामध्ये तूट झालेली आढळते.   


द्रव्य : धातू आणि अधातू वरील व्हिडीयो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहता येतील.


१. द्रव्यः धातू आणि अधातू (भाग - १) [ Matter : Metal And Non - Metal ] (Part - 1)


२. द्रव्यः धातू आणि अधातू (भाग - २) [Matter: Metal And Non - Metal] (Part - 2)


३. द्रव्यः धातू आणि अधातू (भाग - ३ ) [Matter: Metal And Non - Metal] (Part - 3)


४. द्रव्यः धातू आणि अधातू (भाग - ४ ) [Matter: Metal And Non - Metal] (Part - 4)


५. द्रव्यः धातू आणि अधातू (भाग - ५) [Matter: Metal And Non - Metal] (Part - 5)


६. द्रव्यः धातू आणि अधातू (भाग - ६ ) [Matter: Metal And Non - Metal] (Part - 6)


७. द्रव्यः धातू आणि अधातू (भाग - ७) [Matter: Metal And Non - Metal] (Part - 7)


द्रव्य : धातू आणि अधातू वरील व्हिडीयो  ची  प्लेलीस्ट खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवता येईल.






Comments

Popular posts from this blog

प्रकरण 1. पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन

दगडी कोळसा आणि पेट्रोलियम

प्रकरण 5. सजीवांचा मूलभूत घटक