दगडी कोळसा आणि पेट्रोलियम
दगडी कोळसा आणि
पेट्रोलियम
1. CNG आणि LPG इंधन म्हणून उपयोग करण्याचे फायदे कोणते?
उत्तर:- CNG आणि LPG इंधनाचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
1. CNG आणि LPG इंधनाचे जेंव्हा ज्वलन होते, तेंव्हा जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
2. CNG आणि LPG इंधनाचे ज्वलन सहजरित्या होत.
3. CNG आणि LPG इंधनाचे वहन पाईपव्दारे सहजरित्या करता येते.
4. ही इंधने स्वच्छ आहेत.
5. CNG आणि LPG इंधन जळत असताना धूर निर्माण होत नाही.
2.
रस्ते बनवतानां पेट्रोलियमच्या कोणत्या उत्पादिताचा उपयोग केला जातो त्यांची नावे
सांगा.
उत्तर:-
रस्ते बनवतानां
पेट्रोलियमच्या बिटुमेन या उत्पादिताचा उपयोग केला जातो.
3.
मृत वनस्पतीपासून कोळशाची कशी निर्मिती होते त्याचे वर्णन करा. त्या प्रक्रियेला
काय म्हणतात?
उत्तर:-
1. मिलियन वर्षापुर्वी घनदाट अरण्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीखाली गाडली गेली.
2. त्याच्यावरती मातीचे थर वाढत गेले, ज्यामुळे झाडांचे अवशेष दबले गेले.
3. यामुळे उच्च दाब आणि उच्च तापमान निर्माण झाले.
4. अशा परिस्थितीत त्यांचे मंद गतीने ज्वलन होत गेले आणि त्यांचे रूपांतर दगडी कोळशामध्ये झाले.
5. मृत वनस्पतींच्या मंद प्रक्रियेने दगडी कोळशाची निर्मिती होते.यालाच कार्बनीकरण असे म्हणतात.
4.
रिकाम्या जागा भरा.
(a) दगडी कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक ही
जीवाश्म इंधने आहेत.
(b) पेट्रोलियमच्या विविध घटकांना वेगळे करण्याच्या
प्रक्रियेला शुध्दीकरण म्हणतात.
(c) वाहनांसाठी कमी प्रदूषण करणारे इंधन कॉन्प्रेसड
नॅचरल गॅस [CNG]
5.
खालील विधानांना चूक की बरोबर ही खूण करा.
(a) जीवाश्म इंधनाची निर्मिती प्रयोगशाळेमध्ये करता
येऊ शकते. (T/F)
उतर
:- चूक
(b) पेट्रोलपेक्षा CNG जास्त प्रदूषणकारी इंधन आहे. (T/F)
उत्तर :- चूक
(c) कोक हे कार्बनचे अत्यंत शुद्ध स्वरुप आहे. (T/F)
उत्तर :- बरोबर
(d) विविध पदार्थांचे मिश्रण म्हणजे डांबर होय. (T/F)
उत्तर
:- बरोबर
(e) केरोसीन हे जीवाश्म इंधन नाही. (T/F)
उत्तर
:- चूक
6.
जीवाश्म इंधनांना संपणारी नैसर्गिक साधनसंपत्ती असे का म्हणतात? स्पष्टीकरण करा.
उत्तर:-
जीवाश्म
इंधनाच्या निर्मितीसाठी लाखो वर्षाचा कालावधी लागतो. मृत वनस्पती आणि प्राणी अवशेष
जेंव्हा गाडले जातात, तेंव्हा
उच्च दाब आणि तापमानामुळे जीवाश्म इंधनाची निर्मिती होते.म्हणून जीवाश्म इंधनांना संपणारी नैसर्गिक
साधनसंपत्ती असे म्हणतात.
7.
कोकचे गुणधर्म आणि उपयोगाचे वर्णन करा.
उत्तर
:-
कोकचे
गुणधर्म :-
1. कोक कठीण आहे.
2. कोक रंगाने काळा असतो.
3.
कोक सच्छिद्र असतो.
कोकचा उपयोग:-
1. स्टीलच्या निर्मितीसाठी
2. धातूंच्या निष्कर्षणासाठी [ क्षपणक म्हणून ]
8.
पेट्रोलियम निर्मितीच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण करा.
उत्तर
:-
1.पेट्रोल आणि डिझेल ज्या नैसर्गिक
कच्च्या मालापासून प्राप्त होते त्यालाच पेट्रोलियम असे म्हणतात.
2.
समुद्रात राहणार्या सजीवांपासून पेट्रोलियमची निर्मिती होते.
3.हे
सजीव मृत पावतात तेंव्हा त्यांचे शरीर समुद्राच्या तळाशी जाऊन जमा होते.
4.
यावरती वाळू आणि मातीचे थर जमा होतात.
5.
मिलियन वर्षानंतर हवेच्या अनुपस्थितित उच्च तापमान आणि उच्च दाब यामुळे मृत
सजीवांचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मध्ये रुपांतरण होते.
9. खालील
तक्त्यामध्ये 1991 पासून 1997 पर्यंत भारतातील एकूण विजेचा तुटवडा दर्शाविलेला
आहे. या आकड्यांना आलेखाच्या स्वरुपात दर्शवा. वीज तुटवड्याची टक्केवारी Y - अक्षावर दाखवा आणि वर्षे X - अक्षावर दाखवा.
अ.क्र |
वर्ष |
वीज तुटवडा
(%) |
1 2 3 4 5 6 7 |
1991 1992 1993 1994 1995 1996 1997 |
7.9 7.8 8.3 7.4 7.1 9.2 11.5 |
उत्तर:-
दगडी कोळसा आणि पेट्रोलियम वरील व्हिडीयो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहता येतील.
१.दगडी कोळसा आणि पेट्रोलियम (भाग - १) [Coal and Petroleum] (Part - 1)
२. दगडी कोळसा आणि पेट्रोलियम (भाग - २) [Coal and Petroleum] (Part - 2)
३. दगडी कोळसा आणि पेट्रोलियम (भाग - ३) [Coal and Petroleum] (Part - 3)
द्रव्य : धातू आणि अधातू वरील व्हिडीयो ची प्लेलीस्ट खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवता येईल.
Comments
Post a Comment