प्रकरण 1. पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन
1. 1. खाली दिलेल्या यादीतून अचूक शब्द निवडा
आणि रिकामी जागा भरा.
a] एकाच ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढविणे आणि संगोपन
(मशागत) करणे
त्या वनस्पतीना पीक असे संबोधले जाते.
b] पिकांची
वाढ होण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे ही प्रथम पायरी आहे.
c] खराब
बिजे पाण्यावर तरंगतात.
d] पिकांच्या वाढीसाठी पुरेसा सुर्यप्रकाश आणि मातीतून पाणी आणि पोषक घटक
याची आवश्यकता आहे.
2. स्तंभ मधील घटकांची स्तंभ मधील घटकांशी
जोड्या जुळवा.
A
B
1. खरीप पिके - e] भात आणि मका
2. रब्बी - d] गहू,
चणा, वाटाणा
3. रासायनिक खते - b] युरिया आणि सुपर फॉस्फेट
4. सेंद्रीय खत - c] प्राण्यांचे उत्सर्जित पदार्थ , गोबर, मुत्र आणि वनस्पती उत्सर्जित पदार्थ
3. प्रत्येकी दोन उदाहणे द्या
a] खरीप
पीक – भात, मका, सोयाबिन, भुईमूग कापूस इत्यादी.
b] रब्बी – गहू,
चणा, वाटाणा, मोहरी आणि
जवस
4.
खालील दिलेल्या प्रत्येकाचा तुमच्या
शब्दात एक परिच्छेद लिहा.
a] जमिनीची मशागत करणे –
§ माती भुसभुशीत करणे, ह्युमस
मिसळणे आणि मातींच्या थरांची आलटापलट करणे लाच जमिनीची मशागत असे म्हणतात.
§ यामध्ये
मातीच्या थरांची आलटपालट केली जाते.ज्यामुळे माती भुसभुशीत होते.
§ मशागत
करताना ह्युमस किंवा खत मिसळले जाते.ज्यामुळे जमीन सुपीक बनण्यास मदत होते.
§ जमिन
भुसभुशीत झाल्याने हवा खेळती रहाते. ज्यामुळे मुळांची वाढ व्यवस्थित
होते.गांडुळांची संख्या वाढण्यास मदत होते.
§ जमिनीची सुपिकता वाढल्याने पिकांचे उत्पन्न देखील वाढते.
b] पेरणी
§ पिकांच्या उत्पादनामध्ये पेरणी हा
सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
§ पेरणी करण्यापुर्वी चांगली गुणवत्ता
असलेल्या बियाणांची निवड केली जाते.
§ शेतकरी जास्त उत्त्पन्न देणार्या
बियाणांची निवड करतो.
§ या चांगल्या प्रतीच्या बियाणांची पेरणी
पारंपारिक पध्दतीने अथवा आधुनिक
अवजारांच्या सहाय्याने केली जाते.
c] तणनिर्मुलन
§ मुख्य पिकांबरोबर उगवणार्या अनावश्यक वनस्पतीना तण असे म्हणतात.
§ तण काढून टाकण्याच्या प्रक्रियेला तणनिर्मूलन असे म्हणतात.
§ तण मुख्य पिकांबरोबर पाणी, प्रकाश घटकांसाठी स्पर्धा करतात.
§ पिकांच्या वाढीवर यांचा दुष्परिणाम होतो.
§ तण कापणीच्यावेळी अडथळा निर्माण करतात.
§ जमिनीतील पोषक घटक शोषून घेतात.
§ तणनिर्मूलनाच्या पध्दती –
- हाताने उखडून टाकणे,
- जवळून कापून टाकणे,
- तणनाशकाचा उपयोग करणे
- जमीन पाड पाडून पल्टी करणे व त्यातून तण उपटणे
d] मळणी [थ्रेशिंग]
§ कापणी केलेल्या पिकांमधून बीज किंवा दाणे वेगळे करतात यालाच मळणी असे म्हणतात.
§ ही प्रक्रिया कॉम्बाईन या यंत्राने केली जाते हे यंत्र हार्वेस्टर आणि थ्रेशर (मळणी यंत्र) यांचे संयुक्त रूप आहे.
§ काही शेतकरी गवत आणि धान्य पाखडून वेगळे करण्यासाठी विनोईंग यंत्राचा वापर करतात.
4. 5. नैसर्गिक खतांपेक्षा कृत्रिम खते
कशी वेगळी आहेत? स्पष्ट करा.
उत्तर : -
|
कृत्रिम खते |
नैसर्गिक खते |
1. |
ही असेंद्रिय क्षार असतात. |
1.हे नैसर्गिक पदार्थापासून बनलेले असते. |
2. |
याचे उत्पादन कारखान्यामध्ये करतात. |
2.याची निर्मिती शेतामध्ये/ नैसर्गिक
पध्दतीने करतात. |
3. |
यामुळे जमिनिला ह्युमस मिळत नाही. |
3.यामुळे जमिनिला ह्युमस मिळतो. |
4. |
जास्त वापरल्याने जमिनीचा पोत बिघडतो. |
4.जास्त वापरल्याने जमिनीचा पोत चांगला होतो. |
5. |
यामुळे प्रदूषण होते. |
5.यामुळे प्रदूषण होत नाही. |
6. |
जास्त काळ जमिनीमध्ये राहत नाही. |
6.जास्त काल जमिनीमध्ये टिकून रहातात. |
7. |
नायट्रोजन, फॉस्फरस
आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. |
7.नायट्रोजन, फॉस्फरस
आणि पोटॅशियम कमी प्रमाणात असतात. |
8. |
उदा. NPK,
युरिया इ. |
8.कंपोस्ट, गांडूळ
खत आणि शेण खत. |
6.जलसिंचन
म्हणजे काय? जलसंरक्षण
करणार्या दोन जलसिंचन पध्दतींचे वर्णन करा.
उत्तर: पिकांना विविध कालावधीसाठी पाण्याचा पूरवठा
करणे म्हणजेच जलसिंचन होय
1] तुषार सिंचन तंत्र :
1. या तंत्राचा उपयोग असमान जमिनिवर करतात.
2. कमी पाणी असणार्या ठिकाणी याचा उपयोग करतात.
3. उभ्या नळांच्या डोक्यावर फिरते नोझल व्दारे बाहेर
पडतात.
4. यांचे पिकांवर पावसाच्या पाण्याप्रमाणे सिंचन होत असते.
5. वालुकामय मातीमध्ये तुषार सिंचनाचा फायदा होतो.
2] ठिबक सिंचन तंत्र :
1. या तंत्रामध्ये थेंबाथेंबाने जलसिंचन मुळांजवळ होते
याला ठिबक सिंचन तंत्र म्हणतात.
2. फळांची बाग आणि झाडांना हे तंत्र योग्य असते.
3. यामध्ये पाणी वाया जात नाही.
4. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी हे वरदान आहे.
7]
खरीप ऋतु काळात जर गहू पेरला तर काय होईल? चर्चा करा?
उत्तर : जर खरीप ऋतू मध्ये गहू
पेरला तर प्रतिकुल तापमान आणि रोग यामुळे त्याची वाढ होत नाही. जास्त पावसाने देखील
गव्हाचे उत्पादन घेणे शक्य होत नाही.
8] एकाच शेतामध्ये नियमित पिक घेतल्यामुळे त्याचा मातीवर कसा परिणाम होतो?
वर्णन करा?
उत्तर : एकाच शेतामध्ये नियमित पिक
घेतल्यामुळे जमिनितील वनस्पतीना आवश्यक असणारे पोषक घटकांचे प्रमाण कमी होते
.जमिनिची सुपिकता कमी झाल्यामुळे पिकाचे उत्पन्न कमी होते
9] तण म्हणजे काय?
त्यावर नियंत्रण कसे ठेवाल?
उत्तर : मुख्य पिकांन बरोबर नैसर्गिक रित्या उगवणार्या
अनावश्यक वनस्पतीना तण असे म्हणतात. तण काढून टाकण्याच्या प्रक्रियेला तणनिर्मूलन असे म्हणतात.
तणनिर्मूलनाच्या पध्दती –
1. हाताने उखडून टाकणे.
2. जवळून कापून टाकणे.
3. तणनाशकाचा उपयोग करणे.
4. जमीन पाड पाडून पल्टी करणे व त्यातून तण उपटणे.
10. खालील पेट्या योग्य क्रमात जुळवा जेणे करून
उसाच्या पिकाच्या उत्पादनाचेव रेखाचित्र तयार होईल.
उत्तर:
11.
खालील विधानांची उत्तरे कोड्यात आडवी उभी तिरकस इत्यादी स्वरूपात लपलेली आहेत. ती
शोधून त्यांच्या भोवती लंबगोलाकार खुणा करा.
1.पिकाना
पाण्याचा पुरवठा करणे.
2.योग्य
परिस्थितीत दीर्घकालावधीसाठी धान्य पिके साठविणे.
3.एकाच
प्रकारच्या विशिष्ट वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढ्विणे.
4.तयार
पिक कापण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र.
5.व्दिदल
धान्यापैकी एक रब्बी पिक.
6.गवताच्या
भुसकाट्यापासून धान्य /दाणे वेगळे करण्याची प्रक्रिया.
उत्तर:
वि |
ख |
स |
ख |
त |
क |
छा |
प |
ज |
ल |
सिं |
च |
न |
आ |
का |
वा |
दि |
ई |
र |
वि |
भा |
लि |
ना |
टा |
व |
सा |
ठ |
व |
ण |
का |
पा |
णा |
पि |
बा |
धा |
न्य |
रा |
म |
शु |
अ |
ग |
र |
म |
न |
क |
र |
य |
ओ |
दि |
व |
ळ |
ने |
त्रा |
पा |
ठा |
त |
का |
प |
णी |
यं |
त्र |
बा |
र |
क्षा |
Comments
Post a Comment