प्रकरण 5. सजीवांचा मूलभूत घटक

 

 प्रकरण 5. सजीवांचा मूलभुत घटक

                                                        

     5.1 पान नंबर : 50       

     प्रश्न: 1. पेशींचा शोध कोणी व कसा लावला ?

     उत्तर : पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 साली लावला. त्याने स्वत: बनविलेल्या                        सुक्ष्मदर्शकाखाली झाडाच्या सालीपासुन बनविलेल्या बुचाच्या पातळ चकतीचे                              निरिक्षण केले असता, त्याला मधाच्या पोळ्या प्रमाणे लहान लहान कप्पे आढळले.                          यालाच त्याने पेशी असे  नाव दिले.


    प्रश्न: 2. पेशीला सजीवांमधील रचनात्मक व कार्यात्मक घटक असे का म्हणतात?

    उत्तर : पेशीला सजीवांमधील रचनात्मक व कार्यात्मक घटक असे म्हणतात कारण-

               १. प्रत्येक सजीव हा पेशीनी बनलेला असतो.

               २. सजीवांमध्ये घडणार्‍या सर्व जीवनक्रिया जसे श्वसन, पचन, उत्सर्जन या क्रिया                               पेशीमुळेच घडतात.

               ३. प्रत्येक सजीवांचा मुलभूत घटक हा पेशी आहे.

    

    5.2 पान नंबर : 53

    प्रश्न: 1. CO2 आणि पाण्यासारखे पदार्थ पेशीमध्ये कसे शिरतात आणि पेशीबाहेर कसे                      पडतात यावर चर्चा करा?

    उत्तर : CO2 विसरण क्रियेव्दारे पेशीमध्ये आणि पेशीबाहेर जातो. यावेळी त्याचे वहन जास्त                       संहती कडुन कमी संहती कडे होते.पाणी तर्षण क्रियेव्दारे पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर                     जाते. यावेळी पाण्याच्या रेणुंचे उच्च संहती कडुन कमी संहती कडे वहन होते.


    प्रश्न: 2. पेशीपटलाला निवडक पार्यपटल असे का म्हणतात?

    उत्तर : पेशीपटलाला निवडक पार्यपटल असे म्हणतात कारण पेशी पटल सर्वच पदार्थाना                         पेशीच्या आत किंवा बाहेर न जाऊ देता काही ठराविकच पदार्थांना आत किंवा बाहेर                     जाण्यास मदत करते.


    5.3 पान नंबर : 63

    प्रश्न 1. तुम्ही अशा दोन पेशी अंगकांची नावे सांगू शकाल का की ज्यांच्यामध्ये त्यांचे                          स्वतःचे अनुवंशीक पदार्थ आहेत?

     उत्तर:- लवके आणि कलकणुमध्ये स्वतःचे अनुवंशीक घटक असतात.


     प्रश्न  2. जर एखाद्या पेशीच्या रचनेवर काही रासयनिक किंवा भौतिक परिणाम झाले                         तर  काय होईल?

     उत्तर:- जर एखाद्या पेशीच्या रचनेवर काही रासायनिक किंवा भौतिक परिणाम झाल्यास त्या                     पेशीतील लयकरिका फुटते व तिच्यातील संप्रेरके पेशीचे पचन करून तिला नष्ट                           करतात.


     प्रश्न 3. लयकारिकांना आत्महत्याकूपी असे का म्हणतात?

     उत्तर:- पेशी जेव्हा खराब होते किंवा तिची चयापचय क्रिया बिघडते.तेंव्हा लयकारिका फुटते व                   तिच्यातील संप्रेरके त्या पेशीचे पचन करतात. म्हणून लयकारिकांना आत्महत्याकूपी                       असे म्हणतात.


     प्रश्न 4. पेशीमध्ये प्रोटीन्सचे संयोगीकरण कोठे होते?

     उत्तर:- रायबोसोम्स मध्ये प्रथिनांचे संयोगीकरण होते. खडबडीत आंतरद्रव्यजालिकेवरती                          रायबोसोम्स चिकटलेले असतात.

 

                        स्वाध्याय


    1. प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींची तुलना करा. व प्राणी पेशी वनस्पती पेशींपेक्षा                   वेगळ्या कशा आहेत ते लिहा.

     उत्तर:-

 

     वनस्पती पेशी

   प्राणी पेशी

1.

पेशीभित्ती असते.

पेशीभित्ती नसते.

2.

पेशीकेंद्र पेशीच्या एका कडेला

असते.

पेशीकेंद्र शक्यतो पेशीच्या मधोमध असते.

3.

हरितलवके असतात.

हरिलवके नसतात.

4.

रिक्तिकेचा आकार मोठा असता.

रिक्तिका आकाराने लहान असते.

5.

पेशींचा आकार विशिष्ट असतो.

पेशींचा आकार अनियमित असतो.

6.

पेशीचा आकार मोठा असतो.

पेशी आकाराने लहान असते.

 

    2. प्रोकॅरिऑटिक पेशी युकॅरीऑटिक पेशीपेक्षा वेगळी कशी आहे?

    उत्तर:-

 

    प्रोकॅरिऑटिक पेशी

 युकॅरिऑटिक पेशी

1.

केंद्रपटल नसते.

केंद्रपटल असते.

2.

एक गुणसुत्रे असते.

एकापेक्षा जास्त गुणसुत्रे असतात.

3.

पटलयुक्त पेशीअंगके नसतात

पटलयुक्त पेशीअंगके असतात.

4.

या पेशींचा आकार लहान असतो. 

[1 µm - 10 µm]

या पेशींचा आकार मोठा असतो.

[5 µm- 100µm]

 

   3. पेशी पटल जर फाटले किंवा तुटले तर काय होईल?

   उत्तर:- पेशीपटल जर फाटले किंवा तुटले तर, पेशीला तिच्या आतील किंवा बाहेरील घटकांचे                    तर्षण अथवा विसरण क्रियेव्दारे वहन करता येत नाही.पेशीतील घटक नाहीशे होतील व                  पेशी नष्ट होईल.  

 

   4. पेशीमध्ये जर तनुकले नसतील तर पेशीची अवस्था कशी होईल?

    उत्तर:- तनुकलांचे कार्य : -  1. आंतरद्रव्य जालिकेत तयार झालेले पदार्थ गोळा करून त्यांचे                                                        पेशीच्या आत किंवा बाहेर वहन करणे 

    2. नलिकेत पदार्थ साठवून ठेवणे,रुपांतरित करणे आणि गुंडाळून          ठेवणे

    3. साध्या शर्करेपासून सन्युक्त शर्करा तयार करणे.

    4. लयकारिकांच्या निर्मितीमध्ये मदत करणे.पण जर तनुकले                नसतील वरील कार्ये पेशी करू शकणार नाहीत.  

  

    5. कोणत्या अंगकाला पेशीचे ऊर्जास्थान म्हणतात?का?

    उत्तर:- कलकणूंना पेशीचे ऊर्जास्थान असे म्हणतात.कारण अनेक जीवनावश्यक रासायनिक                    क्रियांसाठी आवश्यक असणारी ऊर्जा ही कलकणूपासून मिळते. ही ऊर्जा ATP                            [अ‍ॅडिनोसाईन ट्राय फॉस्फेट] च्या स्वरूपात असते. या ATP ला पेशीतील ऊर्जेचे                          चलणी  नाणे असे म्हणतात.

    

    6 .पेशी पटल बनविणारे प्रोटिन्स व स्निग्ध पदार्थ कुठे तयार होतात?

    उत्तर:- पेशीपटल बनविणारे प्रोटिन्स व स्निग्ध पदार्थ पेशीतील आंतरद्रव्य जालिकेत तयार होते.

    

    7. अमिबा आपले अन्न कसे मिळवितो?

    उत्तर:- 1.अमीबा आपल्या पृष्ठभागापासून बोटासारखे तात्पुरते भाग तयार करते.

                2. त्याचे आवरण अन्नाभोवती निर्माण करून अन्नपोकळी निर्माण करतो.

                3.नंतर अन्न आत घेतो.

                4.अन्नपोकळीमध्ये संयुक्त अन्नाचे रुपांतर साध्या अन्नामध्ये करते.

                5.या नंतर न पचन झालेले अन्न पृष्ठभागाव्दारे बाहेर टाकले जाते.


    8. तर्षण क्रिया म्हणजे काय?

    उत्तर:- अर्धभेद्य पटलातून पाण्याच्या रेणुंचे उच्च संहितेकडून कमी संहितेकडे वहन होते                            यालाच  तर्षण क्रिया असे म्हणतात.


    9. खालील तर्षणाचा प्रयोग करा.

     साल काढलेल्या बटाट्यांचे चार अर्धे भाग घ्या. त्यापैकी एक भाग उकडलेल्या                     बटाट्याचा घ्या.प्रत्येक भागात एक खळगा करा ते सर्व बटाट्याचे तुकडे पाण्यात                   भरलेल्या भांड्यामध्ये ठेवा.

     a] A बटाटा रिकामा ठेवा.

     b] B बटाट्यामध्ये एक चमचा साखर घाला.

     c] C बटाट्यामध्ये एक चमचा मीठ घाला.

    d] D या उकडलेल्या बटाट्यामध्ये एक चमचा साखर घाला. 

   हे सर्व दोन तास असेच ठेवा.नंतर चारही बटाट्याच्या खळग्यांचे निरिक्षण करा व खालील     प्रश्नांची उत्तरे द्या.  


  1] B आणि C या बटाट्याच्या खळग्यामध्ये पाणी का साठले?

   उत्तर:- कारण B आणि C बटाटे अर्धभेद्य पटलाचे कार्य करतात. पाण्याच्या तर्षण क्रियेने पाणी                  खळग्यामध्ये जमा होते.कारण पेशीच्या बाहेरील मध्यमाची सहंती ही पेशीतील                              सहंतीपेक्षा जास्त असते. म्हणुन B आणि C या बटाट्याच्या खळग्यामध्ये पाणी का साठते.


  2] A बटाट्याची या प्रयोगासाठी का गरज होती?

  उत्तर:-  A बटाटा रिकामा असल्याने तो या प्रयोगाच्या निरीक्षणांची पडताळणी करण्यास                           उपयुक्त ठरतो. बाह्यसहंतीतील बदलाशिवाय बटाट्यामध्ये आपणहून तर्षण क्रिया घडत                 नाही. हे A या बटाट्यावरून समजते.


   3] A आणि D बटाट्यामध्ये असलेल्या खळग्यात पाणी का साठले नाही?

   उत्तर:- A बटाट्यामध्ये पाणी साठत नाही कारण यासाठी आवश्यक असणारा सहंतीतील बदल                यामध्ये नाही. D हा बटाटा उकडल्यामुळे त्यातील अर्धभेद्य पटल नष्ट होते. म्हणुन D                      बटाट्यातील खळग्यात देखील पाणी साठले नाही. 


   10. शरिराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी कोणत्या प्रकारचे पेशीविभाजन आवश्यक            आहे आणि कोणत्या प्रकारच्या पेशी विभाजनाचा समावेश युग्मके निर्मितीसाठी होती?

   उत्तर :- शरिराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी एकसूत्रन पेशीविभाजन  आवश्यक असते.                       युग्मके निर्मितीसाठी अर्धसुत्रन पेशीविभाजन घडते.

 

  प्रकरण 5. सजीवांचा मूलभुत घटकया धडयाचा  विडीयो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहता येईल.




Comments

Popular posts from this blog

प्रकरण 1. पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन

प्रकरण 3. कृत्रिम तंतू आणि प्लॅस्टिक