प्रकरण 2. आम्ल, अल्कली आणि क्षार



प्रकरण 2. आम्ल, अल्कली आणि क्षार


 प्रश्न:- पान नंबर - 22

 1तुम्हाला तीन परिक्षानळ्या पुरविलेल्या आहेत. त्यापैकी एका परिक्षानळीमध्ये   उर्ध्वपातीत पाणी आहे आणखी दोन परिक्षानळीमध्ये अनुक्रमे आम्लीय द्रावण आणि   अल्कलीय द्रावण  आहे. जर तुम्हाला फक्त लाल लिटमस पेपर पुरविला आहेप्रत्येक   परिक्षानळीमधील पदार्थांची ओळख कशी कराल?

      उत्तर:- फक्त लाल लिटमस पेपरचा उपयोग करून दिलेल्या परीक्षानळीतील पदार्थांची ओळख   करता येते. या लिटमस पेपरच्या लाल रंगामध्ये झालेल्या बदलाच्या आधारे परिक्षण करता येते.

1.    ज्या द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर बुडवला असता त्याच्या रंगामध्ये जर बदल झाला नाही. तर याचा अर्थ दिलेले द्रावण हे उदासीन आहे. [उर्ध्वपातीत पाणी]

2.    ज्या द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर निळा होईल, तर दिलेले द्रावण हे अल्कली असेल. [अल्कली द्रावण] नंतर याच निळ्या लिटमस पेपरचा उपयोग पुढील परिक्षणासाठी करता येतो.

3.    वरील पध्दतीने प्राप्त झालेला निळा लिटमस पेपर जर राहिलेल्या द्रावाणामध्ये बुडविला आणि त्याचा रंग जर तांबडा झाला तर दिलेले  द्रावण आम्लीय आहे असे आपण म्हणू शकतो. [आम्लीय द्रावण]

  

  प्रश्न:- पान नंबर – 27

1.        1. पीतळ आणि तांब्याच्या भांड्यामध्ये दही आणि आंबट पदार्थ का ठेवत नाहीत?

       उत्तर:- पीतळ आण तांब्याच्या भांड्यामध्ये दही आणि आंबट पदार्थ ठेवत नाहीत.

      1. कारण दही आणि आंबट पदार्थामध्ये आम्ल असते.

      2. जेंव्हा ते पितळ आणि तांब्याच्या [धातूंच्या] संपर्कात येतात तेंव्हा क्रिया करतात.

      3. नंतर त्यातील पदार्थ विषारी बनतात व अन्नविषबाधा होण्याची शक्यता वाढते ज्याचा                  शरीरावरती वाईट परिणाम होतो.

 

2.        2. धातूंची आम्लांशी रासायनिक क्रिया झाल्यास सामान्यपणे कोणता वायू मुक्त होतो?      उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्टीकरण करा. ह्या वायूच्या अस्तीत्वाची परिक्षा कशी कराल?

       उत्तर:- 1. धातूची आम्लाबरोबर रासायनिक क्रिया झाल्यास हायड्रोजन वायु    निर्माण होतो.

3.        3. स्पष्टीकरण :-

·       आकृतीत दाखविल्याप्रमाणे साहित्याची जोडणी करा.

·       परीक्षानळीत 5 मिली विरल सल्फ्युरिक आम्ल घ्या आणि त्यामध्ये जस्ताचे [झिंक] घ्या आणि त्यामध्ये जस्ताचे काही तुकडे मिसळा.

·       नंतर जस्ताची विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर क्रिया झालेली पहायला मिळेल.

·       या प्रयोगातून निर्माण झालेला वायू साबणाच्या द्रावणातून जायला द्यावा.

·       निर्माण झालेला वायु साबणाच्या द्रावणातून जाताना,आपल्याला बुडबुडे निर्माण झालेले दिसतील.

·       हे बुड्बुडे हलके असल्याने हवेत उडतील.

·       जळती मेणबत्ती बुडबुड्यांजवळ नेली असता, बुडबुड्यातील वायु पेट घेतलेला पहायला मिळेल. यावेळी फट फट असा आवाज निर्माण होईल.

·       या प्रयोगातुन निर्मान झालेला वायू हा हलका आहे. तो पेट घेतो आणि पेट घेताना फट फट असा आवाज करतो. हे सर्व गुणधर्म हायड्रोजन वायूचे असल्याने निर्माण झालेला वायु हा हायड्रोजन असल्याचे सिध्द होईल.


         4. धातू संयुग A विरल हायड्रोक्लोरीक आम्लाशी क्रिया करते आणि उकळीची निर्मिती         होते. त्यातून बाहेर पडलेल्या वायूमुळे जळती मेबत्ती विझते. उत्पादीतामधील जर एक       संयुग कॅल्शीयम क्लोराईड असेल तर त्या रासायनिक क्रियेसाठी समतोल रासायनिक         समीकरण लिहा.

   उत्तर:- जर या रासायनिक क्रियेतील एक उत्पादित कॅल्शियम क्लोराईड असेल आणि निर्माण       झालेल्या वायूमुळे मेणबत्ती विझते याचा अर्थ हा वायू कार्बन डायऑक्साईड असेल. म्हणून धातू     संयुग A हे कॅल्शियम कार्बोनेट असेल.हे रासायनिक समीकरण खालील प्रमाणे लिहिता येईल.       

(मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)   

       CaCO3 [s]   +  2HCl [aq]  CaCl2 [g]        +      CO2 [g]    + H2O [l]

      कॅल्शियमकार्बोनेट  +  हायड्रोक्लोरिक आम्ल               कॅल्शियम क्लोराईड +  कार्बन डायॉक्साइड  +  पाणी

 

   प्रश्न:-  पान नंबर 30 किंवा 31

   1. HCl, HNO₃ इत्यादी जलीय द्रावणामध्ये आम्लीय गुणधर्म दर्शवितात परंतु अल्कोहोल         आणि ग्लूकोज सारख्या संयुगांची द्रावणे आम्लीय गुणधर्म दर्शवित नाहीत. का?

   उत्तर:- द्रावणातील H+ आयन्स हे आम्लीय ग़ुणधर्माला कारणीभूत असतात. HCl आणि HNO3     इत्यादींच्या जलीय द्रावणात H+ आयन्स निर्माण होतात. पण अल्कोहोल आणि ग्लुकोज                 सारख्या  सयुगांच्या द्रावणामध्ये H+ आयन्स निर्माण होत नाहीत म्हणून अल्कोहोल आणि             ग्लुकोज सारख्या संयुगांचे द्रावणे आम्लीय गुणधर्म दाखवत नाहीत.

 

2.         2. जलीय द्रावणामध्ये आम्ल विद्युतप्रवाह वाहून नेतात कारण लिहा?

  उत्तर :- जलीय द्रावणामध्ये आम्ल विद्युतप्रवाह वाहून नेतात.कारण आम्ल त्यांच्या जलीय              द्रावणामध्ये आयनांची निर्मिती करतात. हे आयन विद्युतधारेच्या वहनास मदत करतात.

 

  3. कोरडा HCl वायू लिटमस पेपरच्या रंगामध्ये बदल करत नाही. कारण लिहा?

  उत्तर:-   कोरड्या  HCl वायू मध्ये आयन्स नसतात. म्हणून लिटमस पेपरचा रंग बदलत नाही.  

 

  4. आम्लांना सौम्य किंवा विरल करत असताना पाण्यामध्ये आम्ल मिसळावे परंतु                  आम्लामध्ये पाणी मिसळून नये अशी का शिफारस करण्यात आली आहे?

  उत्तर:- आम्लांना सौम्य किंवा विरल करत असताना पाण्यामध्ये आम्ल मिसळावे परंतु                    आम्लामध्ये  पाणी मिसळून नये अशी का शिफारस करण्यात आली आहे.कारण आम्लामध्ये          पाणी मिसळणे ही उष्मादायी अभिक्रिया आहे.या क्रियेच्यावेळी अधिक प्रमाणात ऊर्जा तयार          होते.ज्यामुळे भाजून जखमा होण्याची शक्यता असते.

 

  5. जर आम्लाचे द्रावण सौम्य केले तर हायड्रोनियम आयनस (H3O+) च्या तिव्रतेवर त्याचा    कसा परिणाम होतो?

  उत्तर:- जर आम्लाचे द्रावण सौम्य केले तर दिलेल्या आकारमानासाठी हायड्रोनियम आयन्सची      संख्या कमी होते आणि द्रावणाची सहंती / तीव्रता कमी होते.

 

  6. जेव्हा सोडीयम हायड्रॉक्साईडच्या द्रावणामध्ये जास्त प्रमाणातील अल्कली विरघळते      तेव्हा हायड्रॉक्साईडच्या आयनांच्या (OH-) तिव्रतेवर कसा परिणाम होतो?

  उत्तर :- जेव्हा सोडीयम हायड्रॉक्साईडच्या द्रावणामध्ये जास्त प्रमाणातील अल्कली विरघळते        तेव्हा हायड्रॉक्साईडच्या आयनांची तीव्रता वाढते. पण असे एका ठराविक मर्यादेपर्यंतच घडते.        नंतर ही तीव्रता स्थिर रहाते.

 

  प्रश्न :- पान नंबर 35

  1. तुमच्याजवळ A आणि B ही दोन द्रावणे आहेत. A द्रावणाचा pH 6 आहे आणि B              द्रावणाचा pH 8 आहे. कोणत्या द्रावणामध्ये हायड्रोजन आयनची  तिव्रता जास्त आहे?            यापैकी कोणते द्रावण आम्लीय आणि कोणते द्रावण अल्कलीय आहे?

  उत्तर:-1.जर pH  7 पेक्षा कमी असेल तर द्रावण आम्लीय असते.

             2. जर pH 7 पेक्षा जास्त असेल तर द्रावण अल्कली असते.

             3. A द्रावाणाचा 6 आहे म्हणून हे द्रावण आम्लीय आहे.

             4. B द्रावणाचा 8 आहे म्हणून हे द्रावण अल्कली आहे.

 

  2. H+ (aq) आयनाच्या तिव्रतेचा द्रावणाच्या स्वरूपावर काय परिणाम होतो?

  उत्तर:- 1. H+ (aq) आयनाची तीव्रता जितकी जास्त तेवढे द्रावण आम्लीय बनते.

              2. H+ (aq) आयनाची तीव्रता जितकी कमी होत जाते तेवढे द्रावण अल्कली बनते.

 

  3. अल्कलीय द्रावणामध्ये H+ (aq) आयन्स असतात का? जर तुमचे उत्तर होय असेल तर          ते अल्कली का असतात?

  उत्तर:- अल्कली द्रावणामध्ये H+ [aq] आयन्स अत्यंत कमी प्रमाणात असतात. पण OH-            आयन्स मात्र अधिक प्रमाणात असतात.त्यामुळे हे द्रावण अल्कली गुणधर्म दाखविते.

 

  4. मातीच्या कोणत्या परिस्थितीत शेतकरी आपल्या शेतातील माती ही भाजलेला चुना          (कॅल्शीयम ऑक्साईड) किंवा पाणी मिसळलेला चुना (कॅल्शीयम हायड्रॉक्साईड) किंवा       खडू (कॅल्शीयम कार्बोनेट) यांच्याबरोबर हाताळील?

  उत्तर:- जेंव्हा माती आम्लीय बनते [pH कमी असतो] तेंव्हा शेतकरी आपल्या शेतातील माती    ही भाजलेला चुना (कॅल्शीयम ऑक्साईड) किंवा पाणी मिसळलेला चुना (कॅल्शीयम                    हायड्रॉक्साईड) किंवा खडू (कॅल्शीयम कार्बोनेट) यांच्याबरोबर हाताळील.

  

  प्रश्न:- पान नंबर 41

  1. CaOCl2 या संयुगाचे सामान्य नाव काय आहे?

  उत्तर :- ब्लिचिंग पावडर

 

 2. ब्लिचिंग पावडरच्या निर्मितीसाठी क्लोरीनची कोणत्या पदार्थाबरोबर क्रिया केली जाते         त्या पदार्थाचे नाव सांगा.

 उत्तर:- ब्लिचिंग पावडरच्या निर्मितीसाठी क्लोरीनची पाणी घालून गुणधर्म बदलेल्या कोरड्या   चुन्याबरोबर [CaOH]2  क्रिया केली जाते.

 

 3. कठीणपाणी मृदू करण्यासाठी कोणत्या सोडीयम संयुगाचा उपयोग करतात त्या                   संयुगाचे  नाव सांगा.

 उत्तर:- सोडियम कार्बोनेट

 

 4. सोडीयम हायड्रो कार्बोनेट द्रावणाला उष्णता दिल्यानंतर काय होईल? या क्रियेसाठी           रासायनिक समिकरण लिहा.

 उत्तर:- जेंव्हा सोडीयम हायड्रो कार्बोनेट द्रावणाला उष्णता दिली जाते. तेंव्हा सोडियम कार्बोनेट     आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो.

(मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)   

                             उष्णता

      2NaHCO3  Na2CO3  +  H2O  +  CO2

     सोडियम हायड्रोजन कार्बोनेट                          सोडियम कर्बोनेट    +      पाणी         +  कार्बन डायऑक्साईड       


 5. प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि पाणी यांच्यातील रासायनिक क्रिया दाखविण्यासाठी                    समिकरण लिहा.

      उत्तर:- प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि पाणी यांच्यामध्ये रासायनिक क्रिया झाली असता जिप्सम तयार               होते.

         (मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)    

       CaSO4.1/2H2O  +  1 1/2H2  CaSO4.2H2O

          प्लॅस्टर ऑफ पॅरीस                             जिप्सम

              

स्वाध्याय

 

  1. एक द्रावण लाल लिटमस पेपरला निळा बनवते त्या द्रावणाचा pH आहे.

     (a) 1       (b) 4      (c) 5      (d) 10

  

  2. एक द्रावण अंड्याच्या कवचांच्या तुकड्यांबरोबर रासायनिक क्रिया करते व        वायूची निर्मिती होते जो वायू चुन्याची निवळी दूधी बनवते ते द्रावण हे आहे.

      (a) NaCl    (b) HCl   (c) LiCl   (d) KCl

 

  3. सोडीयम हायड्रॉक्साईडचे  10 ml द्रावण हे 8 ml हायड्रोक्लोरीक आम्लाच्या        द्रावणाबरोबर पूर्णतः उदासीन होते. जर आपण तेच NaOH द्रावण 20 ml            द्रावण घेतले तर त्या द्रावणाला उदासीन करण्यासाठी पूर्वी घेतलेल्या किती        प्रमाणातील हायड्रोकलोरीक आम्लाची गरज आहे?

      (a) 4 ml      (b) 8 ml       (c) 12 ml      (d) 16 ml

 

  4. अपचनावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा  उपयोग        केला जातो?

      (a) एंटीबायोटीक (प्रतिजैविक)

      (b) ॲनालजेसीक (वेदनाशामक)

      (c) एंटाॲसीड (प्रतिआम्ल)

      (d) एंटीसेप्टीक (पूतिनाशक)

 

 5. खालील रासायनिक क्रियांसाठी प्रथमतः शाब्दीक समिकरण लिहा त्यानंतर       समतोल समीकरण करा.

 (a) विरल हायड्रोक्लोरीक आम्लाची जस्तांच्या कणांबरोबर रासायनिक क्रिया

 उत्तर:- विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर जस्तांच्या कणांबरोबर रासायनिक           क्रिया  झाली असता झिंक सल्फेट तयार होते आणि हायड्रोजन वायु मुक्त.

    

 

(b) विरल हायड्रोक्लोरीक आम्लाची मॅग्नेशियमच्या फितीबरोबर रासायनिक              क्रिया

 उत्तर:- विरल हाड्रोक्लोरिक आम्लाची मॅग्नेशियमच्या फितीबरोबर रासायनिक क्रिया   झाली असता मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू तयार होतो.

(मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)   

       2HCl [aq]   +  Mg [s]       MgCl2 [aq]  +  H2 [g]

 

   

    हायड्रोक्लोरिक आम्ल  +  मग्नेशियम                                मॅग्नेशियम क्लोराईड  + हायड्रोजन



 (
c) विरल हायड्रोक्लोरीक आम्लाची अ‍ॅल्युमिनीयमच्या पावडर बरोबर                      रासायनिक क्रिया.

 उत्तर:- जेंव्हा हाड्रोक्लोरिक आम्लाची अ‍ॅल्युमिनीयमच्या पावडर बरोबर रासायनिक   क्रिया झाली असता, अ‍ॅल्युमिनियम सल्फेट तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त   होतो.

(मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)   

        3H2SO4 [aq]  + 2Al [s]   Al2[SO4]3[aq]   +  3H2 [g]

            सल्फ्युरिक आम्ल   + अ‍ॅल्युमिनियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट   +  हायड्रोजन

 


 (d) विरल हायड्रोक्लोरीक आम्लाची लोखंडाच्या कणांबरोबर रासायनिक                 क्रिया.

 उत्तर:- विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची लोखंडाबरोबर कणांबरोबर रासायनिक         क्रिया झाली असता फेरस ट्रायक्लोरीन तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो.

 

(मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)   
             6HCl [aq]     +  2Fe [s]    2FeCl3  [aq]  +  3H2 [g]

























































































































 

        हाड्रोक्लोरिक अ‍ॅसिड   +      आयर्न            फेरिक क्लोराईड   +  हायड्रोजन



  6. अल्कोहोल आणि ग्लूकोज यांसारख्या संयुगांमध्ये हायड्रोजनचे अस्तीत्व            असते परंतु त्यांना आम्लांमध्ये वर्गिकृत केले नाही. हे एका उपक्रमाव्दारे              सिद्ध करा.

 उत्तर:- अल्कोहोल आणि ग्लूकोज यांसारख्या संयुगांमध्ये हायड्रोजनचे अस्तीत्व   असते परंतु त्यांना आम्लांमध्ये वर्गिकृत केले नाही कारण ही संयुगे त्यांच्या       द्रावणामध्ये आयन्सची निर्मिती करत नाहीत.

 प्रयोगाचा हेतू:- अल्कोहोल आणि ग्लुकोज ही संयुगे आम्ल नाहीत हे प्रयोगाव्दारे   सिध्द करणे.

 साहित्य:- बॅटरी, बल्ब, बटन, चंचुपात्र, खिळा, रबरी बुच, विरल हायड्रोक्लोरिक   आम्ल

 कृती:-  


  1. आकृतीत दाखविल्याप्रमाणे उपकरणांची मांडणी केली.

  2. रबरी बूचावर दोन खिळे बसवून बूच 100 चंचुपात्रामध्ये ठेवून दिले.

  3. आकृतीत दाखविल्याप्रमाणे खिळ्यांना 6 विद्युत घटाच्या दोन्ही टोकांना बल्ब            आणि बटणाच्या सहाय्याने जोडून घेतले.

  4. आता चंचुपात्रामध्ये थोडे विरल हाड्रोक्लोरिक आम्ल ओतले आणि विद्युत प्रवाह        चालू केला.

  5. आता चंचूपात्रामध्ये अल्कोहोल घालुन विद्युत प्रवाह चालू करून निरिक्षण केले.

  6. पुन्हा चंचुपात्रामध्ये ग्लुकोज घालून विद्युत प्रवाह चालू करून निरिक्षण केले.

  

  निरिक्षण : - 1.आम्लाच्या द्रावाणातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता बल्ब पेटला.

  2. अल्कोहोलच्या द्रावाणातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता बल्ब पेटला नाही.

  3. ग्लुकोजच्या द्रावाणातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता बल्ब पेटला नाही.

  

 अनुमान/ सिध्दता:- वरील निरिक्षणावरून असे सिध्द होते की अल्कोहोल आणि                                      ग्लुकोज ही आम्ले नाहीत.

 

 7. उर्ध्वपातीत पाण्यामधून विद्युतप्रवाह प्रवाहीत होत नाही परंतु पावसाच्या           पाण्यामधून विद्युत प्रवाह प्रवाहीत होतो कारण लिहा.

  उत्तर:-

  1. उर्ध्वपातीत पाण्यामधून विद्युतप्रवाह प्रवाहीत होत नाही,कारण त्यामध्ये                      कोणतीही आयनिक संयुगे अथवा आयन्स नसतात.

  2. परंतु पावसाच्या पाण्यामधून विद्युत प्रवाह प्रवाहीत होतो कारण पावसाचे पाणी          खाली पडताना त्यामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड सारखे वायू विरघळून              सौम्य कार्बोनिक आम्ल तयार होते.  याच आम्लीय ग़ुणधर्मामुळे पावसाच्या                  पाण्यामधून विद्युत प्रवाह प्रवाहीत होतो

 

  8. सामान्यपणे आम्ले पाण्याच्या अनुपस्थितीत आम्लीय वर्तन (गुणधर्म)                   दाखवित नाहीत. का?

  उत्तर:- सामान्यपणे आम्ले पाण्याच्या अनुपस्थितीत आम्लीय वर्तन (गुणधर्म)                   दाखवित नाहीत कारण,

            1.आम्लाचा आम्लीय गुणधर्म हा त्यातील H+ आयनांमुळे असतो.

            2.आम्ल जेंव्हा पाण्यात विरघळते तेंव्हाच त्यात H+ आयन तयार होतात.

            3.पण पाणी नसताना आम्ले हायड्रोजन आयन तयार करत नाहीत.


 9. A, B, C, D आणि E पाच द्रावणे आहेत. जेव्हा त्यांची परिक्षा वैश्विक                   दर्शकाबरोबर केली जाते तेव्हा त्या द्रावणांचा pH अनुक्रमे 4, 1, 11, 7 आणि         9 मिळतो. यातील कोणते द्रावण आहे.

 (a) उदासीन?  - द्रावण D  ज्याचा pH 7 आहे.

 (b) प्रबल अल्कलाईन?  - द्रावण C  ज्याचा pH  11 आहे.

 (c) दुर्बल आम्लीय? – द्रावण A ज्याचा pH 4 आहे.

 (d) दुर्बल अल्कलाईन? -  द्रावण E ज्याचा pH 9 आहे.

 (e) प्रबल आम्ल? – द्रावण B ज्याचा pH 1 आहे.

  हायड्रोजन आयनांच्या तिव्रतेच्या चढत्या क्रमाने pH ची मांडणी करा.

  उत्तर:- pH  11 <  pH  9  <    pH 7  <    pH 4 <  pH 1

 

 10. परिक्षानळी A आणि B मध्ये समान लांबीची मॅग्नेशियम तार घेतली. A                 परिक्षानळीमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl) मिसळले. त्याचप्रमाणे                   परिक्षानळी B मध्ये ॲसिटीक आम्ल मिसळले. दोन्ही आम्लांचे प्रमाण                 आणि तिव्रता सारखीच आहे. कोणत्या परिक्षानळीमध्ये अधिक जलद फिस         फिसणारा आवाज येईल आणि का?

 उत्तर:- फिसफिसणारा आवाज परीक्षानळीत A  जास्त येईल.कारण हायड्रोक्लोरिक              आम्ल (HCl) हे अ‍ॅसिटिक आम्लापेक्षा जास्त तीव्र असते. त्यामुळे त्यात जास्त              प्रमाणात हायड्रोजन वायू तयार होतो.

 

11. ताज्या दुधाचा pH हा 6 असतो. त्याचे दह्यामध्ये रूपांतर झाल्याने त्याच्या           pH मध्ये कोणता बदल होईल असे तुम्हाला वाटते? तुमच्या उत्तराचे                     स्पष्टीकरण करा.

 उत्तर:- दुधाचे रुपांतर दह्यात होण्यासाठी लॅक्टीक आम्ल कारणीभूत असते. यावेळी               ते आम्लीय बनते आणि त्याचा pH कमी होतो.

 

 12. एक गवळी ताज्या दूधामध्ये काही प्रमाणात बेकिंग सोडा मिसळतो.

 (a) त्याने ताज्या दुधाचा pH 6 पेक्षा थोडासा अल्कलाईनमध्ये का परिवर्तीत               केला?

 उत्तर:- एक गवळी ताज्या दूधामध्ये काही प्रमाणात बेकिंग सोडा मिसळतो. कारण                 बेकिंग सोडा मिसळल्याने दूध अल्कलाईन बनते. त्यामुळे दुधाचे दह्यामध्ये                 सहजपणे रुपांतर होत नाही. 

 

 (b) हे दूध दह्यामध्ये रूपांतरीत होण्यासाठी जास्त वेळ का घेते?

 उत्तर:- कारण नेहमीच्या दुधापेक्षा असे दूध जास्त अल्कलाईन असते. आणि यामुळे               यात तयार होणारे लॅक्टिक आम्ल पहिल्यांदा उदासिनिकरणासाठी वापरले                 जाते.यानंतर दुधाचे दह्यात रुपांतर होते.

 

 13. प्लॅस्टर ऑफ पॅरीसला आर्द्रता विरोधी भांड्यामध्ये ठेवले पाहिजेत. का ते             स्पष्ट करा.

 उत्तर:- कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसला उघडे ठेवले असता. हवेतील ओलावा शोषून                 त्याचे जिप्सममध्ये रुपांतर होते. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसला आर्द्रता                       विरोधी भांड्यामध्ये ठेवले पाहिजे.  

(मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)   

             CaSO4.1/2H2O  +  1 1/2H2O   CaSO4.2H2O

                         प्लॅस्टर ऑफ पॅरीस                                                  जिप्सम

 

  14. उदासिनीकरण क्रिया म्हणजे काय? दोन उदाहरणे द्या.

  उत्तर :- ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आम्ल आणि अल्कली याची अभिक्रिया                       होऊन क्षार आणि पाणी तयार होते. याला उदासिनिकरण असे म्हणतात.

  उदा.  

(मोबाईल्मध्ये रासाय्निक अभिक्रिया पाहताना मोबाईलची स्क्रीन रोटेट करुन फुल स्क्रीनवर पहा)   

        1. NaOH + HCl          NaCl  +  H2

         2. Mg(OH)2 + H2CO3  MgCO3  + 2H2O


 

 

  15. धुण्याचा सोडा आणि बेकिंग सोड्याचे दोन महत्त्वाचे उपयोग लिहा.

  उत्तर:-

  1.धुण्याचा सोडा:-

     1. काच,साबण आणि कागद कारखान्यामध्ये उपयोग करतात.

     2. घरगुती स्वच्छ्ता करण्यासाठी.

 

 2. बेकिंग सोडा : -

    1. काही अन्नपदार्थ खुसखुशीत करण्यासाठी.

    2. अ‍ॅन्टासीड बनविण्यासाठी याचा वापर केला जातो.


 प्रकरण 2. आम्ल, अल्कली आणि क्षार (इयत्ता दहावी) या धडयाचा  विडीयो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहता येईल.

  



 

 

Comments

  1. Plz 10 vi chya 2nd semister madil lesson no. 8,9,14 ani16 ya lesson che question answer add kara blog mde

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रकरण 1. पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन

दगडी कोळसा आणि पेट्रोलियम

प्रकरण 5. सजीवांचा मूलभूत घटक