प्रकरण 3. कृत्रिम तंतू आणि प्लॅस्टिक


    प्रकरण 3. कृत्रिम तंतू आणि प्लॅस्टिक

स्वाध्याय

1.               1.  काही तंतुना कृत्रिम असे का संबोधतात स्पष्टीकरण द्या.

उत्तर:- जे तंतू मानवनिर्मित असून काही रासायनिक पदार्थांपासून बनविले जातात.त्यांना                     कृत्रिम तंतू असे म्हणतात.लहान लहान रासायनिक घटकांना एकत्र जोडून बनविलेल्या             शृखंलेपासून कृत्रिम तंतू बनतो.उदा. रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर आणि अ‍ॅक्रिलिक.

  

 2. योग्य उत्तराला [ü] असे चिन्हांकीत करा.

      रेयॉन हे कृत्रिम तंतूच्या तुलनेत भिन्न आहे का?

           a] याचे रूप रेशीमप्रमाणे आहे.

      b] हे लाकडी लगद्यापासून प्राप्त करतात.

      c] यांच्या तंतूना नैसर्गिक तंतूप्रमाणे विणले जावू शकते.

उत्तर:- b] हे लाकडी लगद्यापासून प्राप्त करतात.


3.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

a] कृत्रिम तंतूना मानवनिर्मित अथवा कृत्रिम तंतू असे म्हणतात.

b] कृत्रिमतंतूची निर्मितीकच्च्या मालापासून केली जाते. त्याला  पेट्रोरसायन/पेट्रोकेमिकल            असे संबोधतात.

c] कृत्रिम तंतूप्रमाणे प्लॅस्टिकही एक पॉलिमर आहे.


    4.नायलॉन तंतू अतिशय प्रबळ आहेत हे दर्शविणारी उदाहरणे द्या

    उत्तर:- खालील उदाहरणांवरुन नायलॉन तंतू प्रबळ असतात हे सिद्ध होते.

        1. नायलॉनचा उपयोग पर्वत चढण्यासाठीचे दोर बनविण्यासाठी केला

       जातो. कारण नायलॉनचा धागा स्टिल तारेपेक्षा मजबूत असतो.     

   2.कारचे सिटबेल्ट बनविण्यासाठी.

   3.तंबू आणि दोर बनविण्यासाठी.

   4. मासे पकडण्याचे जाळे बनविण्यासाठी.


5. खाद्यपदार्थांच्या साठविण्यासाठी प्लॅस्टिक पात्रांना प्राधान्य का दिले

         जाते! स्पष्टीकरण द्या.

     उत्तर: खाद्यपदार्थांच्या साठविण्यासाठी प्लॅस्टिक पात्रांना प्राधान्य दिले जाते कारण                                  प्लॅस्टिक हे अक्रियाशील असते. त्यामुळे ते खाद्यपदार्थाबरोबर क्रिया करत नाही.

    

    6. थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंग प्लॅस्टिक यांची तूलना करणारे स्पष्टीकरण द्या.

     उत्तर:-   

           

 

     थर्मोप्लॅस्टिक

  थर्मोसेटिंग प्लॅस्टिक

1.

या प्लॅस्टिकचे स्वरूप तापविल्यानंतर बदलते.

या प्लॅस्टिकचे स्वरूप तापविल्यानंतर देखील बदलत नाही.

2.

हे प्लॅस्टिक सहज वाकविता

येते.

हे प्लॅस्टिक वाकविता येत नाही.वाकविण्याचा प्रयत्न केल्यास मोडते.

3.

याचे पुन:चक्रिकरन करता येते.

याचे पुन:चक्रिकरन करता येत नाही.

4.

हे मऊ असते.

हे कठीण असते.

5.

सेंद्रिय द्रावकामध्ये विरघळते.

सेंद्रिय द्रावकामध्ये विरघळत नाही. 

6.

उदा. नायलॉन, P.V.C.

उदा. बॅकेलाइट, मेलॅमाईन.


7.खालील पदार्थ थर्मोसेटिंग प्लॅस्टिकपासुनच का बनविलेले आहेत याचे स्पष्टिकरण करा.

a] पसरट पातेल्याचे हॅन्डल्स:

उत्तर :- पसरट पातेल्याचे हॅन्डल्स थर्मोसेटिंग प्लॅस्टिकपासून बनविली जातात. कारण                थर्मोसेटिंग प्लॅस्टिक हे उष्णतेचे दुर्वाहक आहे आणि हे उष्णतेमुळे मऊ देखील पडत नाही.  


b] विद्युत प्लग्स / स्विचेस / प्लगबोर्डस:

उत्तर :- विद्युत प्लग्स / स्विचेस / प्लगबोर्ड थर्मोसेटिंग प्लॅस्टिकपासून बनविली जातात. कारण              थर्मोसेटिंग प्लस्टिक हे उष्णतेचे आणि विद्युत धारेचे दुर्वाहक आहेत.


8. खालील पदार्थाना पुनःचक्रिकरण करता येणारे आणि पुनःचक्रिकरण न करता              येणारे, असे यामध्ये वर्गिकृत करा.

दुरध्वनी उपकरण,प्लॅस्टिक खेळणी, कुकरचे हॅन्डल्स, कॅरीबॅग्स, बॉल फांउंटनपेन, प्लास्टिक चेंडू, विद्युत तारेवरील प्लास्टिकचे आवरण, प्लॅस्टिक खुर्च्या, विद्युत स्विचेस

उत्तर:- पुनःचक्रिकरन करता येणारे:- प्लॅस्टिक खेळणी, कॅरीबॅग्स, बॉल फांउंटनपेन, प्लास्टिक चेंडू, विद्युत तारेवरील प्लास्टिक्चे आवरण,प्लॅस्टिक खुर्च्या.

पुनःचक्रिकरन न करता येणारे:- दूरध्वनी उपकरण, कुकरचे हॅन्डल्स ,विद्युत स्विचेस.   


9. राणा उन्हाळ्यासाठी शर्टस खरेदी करणार आहे. त्याने सूती शर्ट कि कृत्रिम पदार्थापासून बनलेले शर्टस खरेदी करावेत? राणाला सकारण सल्ला द्या.

उत्तर:- राणाने उन्हाळ्यासाठी कृत्रिम पदार्थापासून बनलेले शर्टस न घेता सूती शर्ट खरेदी करावे. कारण सूती कपडे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरात निर्माण  झालेला घाम शोषून घेतात.नंतर त्याचे बाष्पीभवन होते. ज्यामुळे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत होते.


10.उदाहरणाच्या सहाय्याने दर्शवा की प्लॅस्टिक न गंज चढणारे आहे.

उत्तर:- 

  1. प्लॅस्टिकच्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवलेल्या/ साठविलेल्या पदार्थाबरोबर क्रिया करत नाहीत.
  2.  घरी स्वच्छता करण्यासाठी आणलेले अ‍ॅसिड प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये ठेवले जाते.कारण अ‍ॅसिडची प्लॅस्टिकच्या बाटलीबरोबर क्रिया होत नाही.
  3.  जेंव्हा प्लॅस्टिक ओलाव्याच्या संपर्कात येते तेंव्हा ते गंजत नाही.

11. दात स्वच्छ करणार्‍या ब्रशचे हॅन्डल आणि आखूड केस एकाच पदार्थापासून बनले            पाहिजेत का? तूमच्या उत्तराचे स्पष्टीकरण द्या.

उत्तर:- नाही, कारण दात स्वच्छ करणार्‍या ब्रशचे हॅन्डल पकड व्यवस्थित असण्यासाठी                       कठीण असतात. पण आपल्या हिरड्या नाजुक असल्याने ब्रशचे आखूड केस मात्र                  मऊ असावे लागतात.


12. शक्य तेवढे प्लॅस्टिक टाळा या सल्ल्यासाठी टिप्पणी करा.

उत्तर:- प्लॅस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम:

1.कारण प्लॅस्टिक हे अविघटनशील आहे. यामुळे मातीचे प्रदूषण होते.

2.प्लॅस्टिकमध्ये शिजविलेले अन्न ठेवल्यास ते बाधीत किंवा विषारी बनते.

3.प्लॅस्टिक कचरा जनावरांनी खाल्ल्यास त्यांचा मृत्यु होऊ शकतो.

4. सांडपाण्याचा निचरा प्लॅस्टिक कचर्‍यामुळे होत नाही यामुळे जलप्रदूषण वाढते.

5.प्लॅस्टिक कचरा जाळल्यामुळे विषारी वायु बाहेर पडतात. जे वायूप्रदूषण घडवितात.

6.समुद्रामध्ये प्लॅस्टिकचा कचरा तरंगतो.जो जलीय अन्नसाखळीवरती परिणाम करतो.


13. A स्तंभ मधील संज्ञाना B स्तंभामधील दिलेल्या वाक्याना अचूक जुळवा.

          A                                    B

1.  पॉलीस्टर       -  d] सहजपणे कपड्याना गुंडाळी पडत नाही.

2.  टेफ्लॉन         -  c] न चिकटणार्‍या स्वयंपाकाच्या भांडयाच्या निर्मितीसाठी

3.  रेयॉन            -  a] लाकडी लगद्याचा उपयोग करून निर्मिती

4.  नायलॉन       -  b] पॅराशूट आणि पायमोज्याच्या निर्मितीसाठी


   14. कृत्रिम तंतूची निर्मिती करणे हे वास्तविकता वनांचे संरक्षण करण्यास मदत करते                 यावर टीप लिहा.

   उत्तर:- 

   1. कृत्रिम तंतूच्या निर्मितीसाठी रासायनिक पदार्थांचा कच्चा माल म्हणुन उपयोग केला जातो

   2. यासाठी वनातून मिळणार्‍या नैसर्गिक कच्च्या मालाची गरज नसते.

   3. कृत्रिम तंतूच्या वाढत्या निर्मितीमुळे वनातील कच्च्या मालाच्या मागणीचे प्रमाण घटले आहे.

 

  15. थर्मोप्लॅस्टिक हे विद्युत प्रवाहाचे मंदवाहक आहे हे दर्शविणार्‍या उपक्रमाचे वर्णन करा.

  उत्तर:- 

  उद्देश :- थर्मोप्लॅस्टिक हे विद्युत प्रवाहाचे मंद वाहक आहे हे प्रयोगाने सिध्द करणे.

  साहित्य: - बल्ब, बॅटरी, विद्युत वायर, धातूचा तुकडा, थर्मोप्लॅस्टिक,

 



   कृती:- आकृतीत दाखविल्याप्रमाणे उपकरणाची मांडणी केली.सर्वप्रथम विद्युत मंडल पुर्ण                      केले.केलेले विद्युत मंडल चालू आहे का हे पाहण्यासाठी लोखंडाचा तुकडा विद्युत                      मंडलामध्ये जोडला.आणि नंतर थर्मोप्लॅस्टिकचा तुकडा वापराला.

  निरीक्षण:-  थर्मोप्लॅस्टिकचा तुकडा जेंव्हा विद्युत मंडलामध्ये जोडला तेंव्हा बल्ब पेटला नाही.

  सिध्दता:-  निरिक्षणावरून असे सिध्द होते कि, थर्मोप्लॅस्टिक हे विद्युत मंदवाहक आहे.


प्रकरण 3. कृत्रिम तंतू आणि प्लॅस्टिक या धडयाचा  विडीयो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहता येईल.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रकरण 1. पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन

प्रकरण 5. सजीवांचा मूलभूत घटक