प्रकरण 2. सुक्ष्मजीव मित्र आणि शत्रू
प्रकरण 2 सुक्ष्मजीव
मित्र आणि शत्रू
स्वाध्याय
प्र.1. रिकाम्या जागा भरा.
A] सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण सुक्ष्मजीव पाहू शकतो.
B] हवेमधील नायट्रोजनचे
स्थिरिकरण नील हरित शैवाल करते व त्यामुळे मातीची सुपिकता वाढते.
C] यीस्टच्या सहाय्याने अल्कोहोलची निर्मिती करतात.
D] विब्रियो कॉलरी या बक्टेरियामुळे कॉलरा हा रोग होतो.
प्र.2 योग्य
उत्तरे निवडा.
A] खालील घटकांच्या निर्मितीसाठी यीस्टचा उपयोग
करतात.
a] साखर b] अल्कोहोल
c] हैड्रोक्लोरिक आम्ल d] ऑक्सीजन
B] खालील पैकी हे प्रतिजैविक [antibiotic] आहे.
a] सोडियम बाय सल्फेट b] स्ट्रेप्टोमायसिन
c] अल्कोहोल d] यीस्ट
C] खालील आदिजीवांपैकी मलेरियाचा वाहक
a] अॅनाफिलस डासाची मादी b] झुरळ
c] माशी d]
फुलपाखरू
D] संसर्गजन्य रोगांचा सर्व
सामान्य प्रसारक
a] मुंगी
b] माशी
c] ड्रॅगन फ्लाय d] कोळी
E] ब्रेड किंवा इडलीची पीठ खालील
कारणामुळे फुगते
a] उष्णता b] दळल्यामुळे
c] यीस्ट पेशींच्या वाढीमुळे d] मळल्यामुळे
F] साखरेपासून अल्कोहोल तयार
होण्याची क्रिया
a] नैट्रोजनचे स्थिरिकरण b] मोल्ड c] आंबविणे d] संसर्ग
प्र 3.स्तंभ A मधील घटकांची स्तंभ B मधील त्यांच्या संबंधीत
क्रियांशी जोड्या लावा.
A B
1 बॅक्टेरिया e] कॉलराला कारणीभूत
2. र्हायझोबियम a] नैट्रोजनचे स्थिरिकरण
3. लॅक्टोबॅसिलस b] दही तयार होणे
4. यीस्ट c] ब्रेड तयार करणे
5. आदिजीव d] मलेरियाला कारणीभूत
6. विषाणू f] एडसला कारणीभूत
प्र 4. नुसत्या डोळ्यांनी सुक्ष्मजीव दिसतात का? तसे नसेल
तर आपण त्यांना कसे पाहु शकतो?
उत्तर. सुक्ष्मजीव
आपण नुसत्या डोळ्यानी पाहू शकत नाही.सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण
सुक्ष्मजीवाना पाहू शकतो.
प्र. 5. सुक्ष्मजीवांचे मुख्य गट कोणते?
उत्तर. सुक्ष्मजीवांचे मुख्य चार गट आहेत. 1. बॅक्टेरिया 2. फंगी [कवक] 3.आदिजीव
किंवा [प्रोटोझोआ] 4. अल्गी [शैवाल]
प्र. 6. हवेतील नैट्रोजनचे स्थिरिकरण
करणार्या सुक्ष्मजीवांची नावे सांगा.
उत्तर. र्हायझोबियम, नील हरित शैवाल, अॅनाबिना, नॉस्टॉक
आणि अॅझोटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे स्थिरिकरण करतात.
प्र. 7. सुक्ष्मजीवांचे आपल्या
आयुष्यातील उपयोग यावर 10 ओळी लिहा.
उत्तर.
सुक्ष्मजीवांचे उपयोग :
- दुधाचे दह्यात रुपातर करणे. [लॅक्टोबॅसिलस]
- ब्रेड बनविण्यासाठी. [यीस्ट]
- अल्कोहोल, वाईन तयार करण्यासाठी.
[यीस्ट]
- अॅसिटिक आम्ल किंवा व्हिनेगार तयार करण्यासाठी. [अॅसिटिक अॅसिड बॅक्टेरिया]
- अॅन्टीबायोटिक्स तयार करण्यासाठी. [स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, इरीथ्रोमायसिन]
- व्हॅक्सिन तयार करण्यासाठी
- जमिनिची सुपिकता वाढविण्यासाठी
- टाकाऊ पदार्थांना कुजवून खतांमध्ये रुपांतर करण्यासाठी.
- नैट्रोजनचे स्थिरिकरण करण्यासाठी. [अॅझेटोबॅक्टर, नील हरित शैवाल]
- इडली व डोशाचे पीठ आंबविण्यासाठी. [यीस्ट]
प्र. 8.सुक्ष्मजीवानमुळे होणार्या उपद्रवावर एक परिछेद लिहा.
उत्तर.
1. काही सूक्ष्मजीव हे हानीकरक आहेत.कारण
ते मानवामध्ये तसेच प्राण्यामध्ये देखील रोग निर्माण करतात. 2. सामान्यपणे होणारा सर्दी, खोकला, क्षयरोग, कांजण्या,
गोवर, देवी, कॉलरा,
टायफाइड, पोलिओ व मलेरिया या सारखे रोग होतात.
3. प्राण्यांमध्ये अॅन्थ्रेक्स सारखे
भयानक रोग होतात. 4. अन्नविषबाधेसाठी देखील सुकक्ष्मजीव कारणीभूत असतात. 5.
अन्न, चामडे आणि कपडे यांचा नाश करतात. 6. वनस्पतीमध्ये
सिट्रस कॅन्कर, गव्हावरील तांबेरा व भेंडीतील पिवळ्या
शिरांची रचना निर्माण करतात
प्र.9.प्रतिजैविके
म्हणजे काय?ही प्रतिजैविके [अॅन्टीबायोटिक्स]
शघेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
उत्तर.
जी औषधे आपल्या शरिरातील रोग निर्माण करणार्या
रोगांची वाढ थांबवितात किंवा त्यांना नष्ट करतात त्यांना प्रतिजैविके असे
म्हणतात.उदा. स्ट्रेप्टोमयसिन, टेट्रासायक्लिन आणि
इरायथ्रोमायसिन इत्यादी.अॅन्टीबायोटिक्स ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ
नयेत.कारण ती आवश्यकता नसताना किंवा चुकिच्या प्रमाणात घेतली असता.त्याचे
शरिरावरती वाईट परिणाम होतात.कारण अॅन्टीबायोटिक्स च्या चुकिच्या
सेवनाने.शरिरातील चांगले बक्टेरियादेखील मरून जातात.तसेच भविष्यामध्ये गरज असताना
त्यांचे सेवन केल्यास त्याचे अपेक्षित परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीत.
प्रकरण 2) सुक्ष्मजीव मित्र आणि शत्रू
प्रकरण 2 सुक्ष्मजीव मित्र आणि शत्रू
nice presentation
ReplyDeletethank you
DeleteNice presentation
ReplyDeletethank you
ReplyDeleteThanks
ReplyDelete